- फिर्यादीची तक्रार; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- गंभीर अवस्थेतील रुग्णाला डॉक्टरांनी अलझुमॅब एल या इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगितले. दरम्यान फिर्यादी यांचा आरोपी सोबत संपर्क झाला. आरोपीने अलझुमॅब एल हे इंजेक्शन ५० हजार रुपयांना विकत मिळेल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ५० हजार रुपये आरोपीला दिले.
पैसे घेतल्यानंतर देखील आरोपीने फिर्यादी यांना इंजेक्शन दिले नाही तसेच त्यांचे पैसेही देण्यास टाळाटाळ केली. ही घटना २९ एप्रिल रोजी रात्री गुरुद्वारा रोड, देहूरोड येथे घडली.
याबाबत अनिल गोविंद ठोंबरे (वय ४७, रा. देहूरोड) यांनी मंगळवारी (दि. ११) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुज सोपान नाईकरे (वय ३१, रा. यमुनानगर, निगडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.