- त्यांच्याच कार्यालयात घडली घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- चिंचवड स्टेशन परिसरात पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयातच त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यात ते सुदैवाने बचावले. ही घटना आज बुधवारी (दि. १२) रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घडली. घटनेचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.
आरोपीने पिस्तूलातून गोळ्यांच्या तीन फैरी झाडल्याची माहिती समजली आहे. तानाजी पवार असे संशयिताचे नाव असून त्याला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, संशयित तानाजी पवार आणि त्याच्यासोबत आणखी एक जण आज दुपारी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून ३ राऊंड फायर केले. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना घटनास्थळावरून २ पुंगळया, १० ते १२ राऊंड, पिस्टल, २ मॅगझीन मिळाल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत. या घटनेत कुणीही जखमी झालेल नाही.