- तरून गंभीर जखमी; मित्रावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रावर चाकूने वार केले. ही घटना मंगळवारी (दि.८) सायंकाळी लांडेवाडी, भोसरी येथे घडली. गणेश शाहू चव्हाण असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा भाऊ दिनेश शाहू चव्हाण (२०, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन भास्कर सगट (२३, रा. लांडेवाडी भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी दिनेश आणि त्यांचा भाऊ गणेश मित्रांसोबत लांडेवाडी येथील मोकळ्या जागेत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी रोहन याने नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून गणेशवर चाकूने वार केले. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला आहे.