- शहर भाजप अनुजाती युवा मोर्चाचा उपक्रम..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- कोरोनामुळे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत भाजप अनुजाती युवा मोर्चाच्या वतीने निगडी यमुनानगरमधील रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजप अनु जाती युवा मोर्चाचे सचिन उदागे, नगरसेवक तथा क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे, स्वी. नगरसदस्य दिनेश यादव, शिवराज लांडगे, उदय गायकवाड, रोहन भिसे, आदित्य कुलकर्णी, दिपक घन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.