- अर्ज वाटप व स्वीकृतीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- महापालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडून पीएमपीएमएलच्या मोफत बस पाससाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज वाटप व स्वीकृतीची मुदत ३१ जुलैपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत राहणार आहे. अर्ज वाटप पिंपरीतील लोखंडे कामगार भवनात सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महापालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएलचा बस पास देण्यात येतो. त्या अनुषंगाने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता दिव्यांग व्यक्तींकडून मोफत पाससाठी अर्ज मागविले आहेत. अर्जवाटप व स्वीकृतीची जुलैपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत राहणार आहे. अर्ज वाटप पिंपरीतील कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवनात सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल.
नवीन पास आणि नूतनीकरणासाठी आणि ओळख पडताळणीसाठी दिव्यांग व्यक्तीनी आधारकार्डची झेरॉक्स प्रत, एक फोटो, रेशनकार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन यावे. कोरोनामुळे दिव्यांगांनी सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.