- एकाची साडेबारा लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- नोकरीसाठी तरुणाने नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर बायोडाटा अपलोड केला होता. अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन केला. टाटा मोटर्स या कंपनीत सुपरवायझरची नोकरी लावतो असे सांगत त्यांना आमिष दाखवले. नंतर वेगवेगळ्या कारणासाठी तबल १२ लाख ५९ हजार रुपये घेतले.
अखेर नोकरी लावली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता लक्ष्मण अप्पा गवस (वय ५१) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास गुप्ता व नरेंद्र तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रोड पोलीस तपास करत आहेत.