- टोळीप्रमुखासह तिघांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- चिंचवड येथील सुरज उर्फ ससा वाघमारे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रमानाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. १६) याबाबतचे आदेश दिले आहेत.
टोळीप्रमुख सुरज उर्फ ससा राजू वाघमारे (वय २४), स्वप्नील सिद्राम माडेकर (वय २३), राजा सिद्राम माडेकर (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्यासह अन्य एका अल्पवयीन आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससा वाघमारे टोळीतील सदस्य हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, अवैध शस्त्र वापरणे यासारखे एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या जोरावर आरोपी परिसरात दहशत पसरवत होते. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.