- केवळ १४ विद्यार्थी अनुत्तीर्ण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२१) :- महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. पिंपरी – चिंचवड शहराचा ९९.९२ टक्के विक्रमी निकाल लागला आहे. शहरातील १९,३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यातील १९,३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा शहरातील १९,३७३ विद्यार्थी दहावीला होते. त्यातील १९,३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. यामध्ये १०.३२५ मुले तर ९.०४६ मुलींचा समावेश होता. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९९.८९ टक्के, तर मुलींचे पास होण्याचे प्रमाण हे ९९.९६ टक्के आहे. यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील यंदा अवघे १४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११ मुले तर ३ मुलींचा समावेश आहे. लेखी आणि अंतर्गत परीक्षा न दिलेले. तसेच वर्षभर शाळेत न आलेल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. यंदा परीक्षा न होता पास झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.