- दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२१) :- प्रांत अधिकारी आहे, बँकेकडून जुन्या गाड्यांचे लिलाव करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. तसेच चारचाकी गाडी घेऊन देण्याचे आमिष दाखवले.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये, अक्षय पाटील यांच्या आई कडून ४१ हजार रुपये, संजय शेटे यांच्याकडून ४२ हजार रुपये असे एकूण दोन लाख १३ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तुषार याने गाडी न देता फिर्यादी यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली.
ही घटना २५ मार्च २०२० ते ३ जानेवारी २०२१ या कालावधीत दिघी आळंदी रोडवरील माऊली मल्टी कार केअर सेंटरमध्ये घडली. अवदेशकुमार रमाकांत मिश्रा (वय ५६, रा. गणेशनगर, दापोडी) यांनी रविवारी (दि. १) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार मारुती ठिगळे (पूर्ण पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.