- यंत्राची क्षमता १५० एलपीएम; २० पेक्षा जास्त रुग्णांना होणार फायदा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- शहर कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून या काळात काही खाजगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून शहरावरील संकटाच्या विविध यंत्रसामुग्री देऊन महापालिकेस सहकार्य करीत आहेत, त्याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आज मेडीकल ऑक्सीजन जनरेटर प्लॅन्ट हस्तांतरीत केला. महानगरपालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांनी ही यंत्रसामुग्री स्विकारली.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, डॉ. प्रविण सोनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे जनरल मॅनेजर के. राजेंद्र, सिनीयर डेप्युटी जनरल मॅनेजर शामकुमार मोदी, चेतन औटी पाटील, अशोक राऊत, संजीव देशपांडे, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे उपस्थित होते.
भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने सी. एस. आर. अंतर्गत रुग्णालयातील ट्राएज एरियाकरीता दिलेल्या मेडीकल ऑक्सीजन निर्मिती यंत्राची क्षमता १५० एल पी एम आहे. याचा उपयोग ट्राएज एरियामधील २० पेक्षा जास्त रुग्णांना होणार आहे. या यंत्रामुळे ट्राएज एरियामध्ये ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता भासणार नाही अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
महापौर माई ढोरे यांच्या हस्ते भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे जनरल मॅनेजर के. राजेंद्र, सिनीयर डेप्युटी जनरल मॅनेजर शामकुमार मोदी, चेतन औटी पाटील, अशोक राऊत, संजीव देशपांडे यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
 
                                                                     
                        		                     
							













 न्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.
    न्यूज पीसीएमसी Whatsapp Share करीता आपला मो.नं.रजिस्टर करा.