न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १२) :- कुदळवाडी येथील पिंपरी चिंचवड म. न.पा. प्राथमिक शाळा क्र. ८९ येथे आज शनिवार (दि. १२) रोजी स्वच्छता रॅली व स्वछता अभियानांतर्गत संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी नगरसेविका अश्विनी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव, स्वी. नगरसेवक दिनेश यादव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, ”भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ (गांधी जयंती) रोजी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. आज देशातील सर्व शाळा, दवाखाने, बँका, पोष्ट ऑफिस, सर्व सार्वजनिक कार्यालयांच्या आवारात स्वच्छता ठेवली जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज शालेय परिसर व वर्ग स्वच्छ ठेवला तर शालेय वातावरण आल्हाददायक राहील.”
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सगभोर सर व शाळेतील सर्व शिक्षकांनी केले तर प्रास्ताविक पोटघन सरांनी केले. खामकर सरांनी आभार मानले.











