शहरात ७६ केंद्रांवर मिळणार ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने ११८०० ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस गुरुवारी (दि. २) रोजी ५९ लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहेत.
एकूण ११८०० डोसपैकी पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे ११८० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने २९५ डोसेस व उर्वरीत १०४२५ डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने ३६०० ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोसेस ९ लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहेत.
एकूण ३६०० पैकी ९०० डोसेस हे पहिल्या लसीकरणासाठी राखीव आहेत. त्यातील पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे १८० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ४५ डोसेस व उर्वरीत ६७५ डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
शिल्लक २७०० कोविड डोसेस हे दुसऱ्या लसीकरणासाठी राखीव आहेत. त्यातील पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे १८० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ४५ डोसेस व उर्वरीत २४७५ डोसेस हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
ज्या नागरिकांची‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. २) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी पिं. चि. मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.












