न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१२ जाने.) :- राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खासदार बारणे यांच्यावर केलेले आरोप शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खोडून काढले आहेत. यात बाबर यांनी दत्ता साने यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ते म्हणाले की, साने यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांची राजकीय अपरिपक्वता त्यांच्या पत्रकबाजीतून दिसून येते. खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वत: या बाबत प्रतिक्रिया दिली नाही.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपले मत मांडत असताना. कोण पार्थ पवार, पार्थ पवारची ओळख केवळ अजितदादांचे पुत्र एवढीच आहे. त्याचे सामाजिक काम काय आहे. बारणे गेली पंचवीस वर्षे या शहरामध्ये राजकीय व सामाजिक काम केले असून, नगरसेवक ते खासदार अशी त्यांची ओळख आहे. महापालिकेच्या पाच निवडणुका, विधानसभा, लोकसभा आशा निवडणुका लढवलेले खासदार आप्पा बारणे लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे.
दत्ता साने यांना खासदार आप्पा बारणे यांची व शहराची राजकीय पार्श्वभूमी माहित नाही. ते त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. स्थायी समितीचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले शाम वाल्हेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून बारणे यांनी राष्ट्रवादीचा पराभव करून मिळवले होते. ४२ दिवस चाललेल्या या निवडणुकांचा इतिहास पिंपरी-चिंचवड शहरवाशियांना माहिती आहे. महापालिकेमध्ये सत्तापक्षाच्या चुकीच्या कामावर आवाज न उठवणारे साने हे विरोध पक्षनेता नाहीत तर, सत्ताधारी पक्षाचा खरेदी नेता असल्याचे बाबर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.











