न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १२ जाने.) :- गतिमंद अल्पवयीन १४ वर्षीय मुलगी तिच्या वडिलांसह चाकण येथे राहते. तिचे वडील शेतकरी आहेत. तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी आजारामुळे निधन झाले होते. मुलीची जबाबदारी वडिलांवर होती. दोन दिवसांपूर्वी मुलीचे वडील शेतात कामासाठी गेले होते.
तर, पीडित मुलगी घरी एकटीच होती. यादरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पीडित मुलीच्या आत्याचे पती घरात पोहोचले. त्यांनी दरवाजा बंद करुन पीडित मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणाची वाच्यता केल्यास घरच्यांना कोयत्याने ठार मारु अशी धमकी देत पिडितेला मारहाण केली. चाकण पोलिसांनी ४६ वर्षीय मामाला अटक केली आहे. याबाबत ४१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.











