न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जाने.) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे निष्ठावान उद्योजक पंडीत गवळी यांचा मुलगा योगेश गवळी यांची पिंपरी चिंचवड शहर युवक कार्याध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवार यांनी बुधवार (दि. ९ रोजी) सोपवली आहे.
निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी पक्षाचे जीव तोडून काम करणारे युवक कार्यकर्ते एकत्र करण्याची जबाबदारी युवकांची आहे. त्यामुळे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या बरोबर काम करण्यासाठी युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची निवड केली आहे, असे अजित पवार म्हणाले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, नाना काटे, पंडीत गवळी, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संजय वाबळे आदी सर्व विद्यमान नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या, अडी-अडचणी सोडवण्याचा व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे, योगेश गवळी म्हणाले आहेत.











