न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जाने.) :- येत्या पंधरा दिवसात शास्तीचा निर्णय मंत्रीमंडळात मी घेईन. शास्तीच्या संदर्भात सामान्य मानसाला दिलासा मिळाला पाहिजे. अशी घोषणा बुधवार (दि. ९) रोजी पिंपरी चिंचवड दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
याचे शहरातील नागरिकांना स्मरण व्हावे. तसेच सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेची कार्यवाही करावी, याकरीता आज शनिवार (दि. १२) रोजी सर्व विरोधीपक्षीय नेत्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर ”पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो शास्तीकर माफ होतोय, दिवस राहिले १२” असा ‘काऊंट डाऊन’चा फलक महापालिका भवनासमोर लावला आहे.
उद्या महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयासमोर ‘काउंट डाऊन’चा फलक लावला जाणार आहे. या फलकावर विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे यांची नावे आहेत.











