- शाळांकडून विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड तयार करण्यास सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- शाळा, महाविद्यालयानंतर आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत.
मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे. दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेणे शक्य होईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
शिक्षक आणि मुख्याध्यापकांनीही पहिली ते चौथीच्या शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत होणारी सुधारणा अशीच कायम राहिली, तर दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या वर्गांनाही मुहूर्त लागेल. विद्यार्थ्यांची माहीती मागविण्यास शाळांनी सुरूवात केली आहे.