- हत्यारासह आरोपी जेरबंद; भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२१) :- कासारवाडीतील सिंतागण गार्डन परिसरात शुक्रवारी (दि. १२) रात्री अकराच्या दरम्यान आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. कोयते, ब्लेड, लाकडी दांडके, स्क्रु ड्रायव्हर, हातोडी, मिरची पूड हे साहित्य त्यांनी जवळ बाळगले होते.
भोसरी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळावरून आरोपींना जेरबंद केले. साईराज दिवाकर वाघमारे (वय २०), सुरज राजू लांडगे (वय २२), राहुल शंकर मिरेकर (वय २०) शुभम बाबु कदम (वय २१), आकाश सोमनाथ जगधणे (वय १९) आणि प्रशांत श्रीसेल कासमे (वय १९) (सर्व रा, पिंपळे गुरव) असे अटक आरोपी यांची नावे आहेत. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.












