न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे. २०२२) :- आकुर्डीतील पंचतारानगर येथे फिर्यादीची कामाची साईट सुरु आहे. फिर्यादी, त्यांचा सुपरवायझर, मित्र, कामगार यांना आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली.
तुला इथे काम करायचे असेल तर चार लाख रुपये खंडणी द्यावी लागेल. जर पैसे दिले नाहीत तर फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच फिर्यादीची कामाची साईट बंद पाडली.
अनिल बाबुराव पवार (वय ४३, रा. रामदास नगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल अमृत सोनवणे (रा. पंचतारानगर, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.