न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे. २०२२) :- नेहरुनगर येथे होत असलेल्या न्यायालयाजवळ पोलीस चौकी उभारण्याची मागणी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार
असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत पिंपरी-नेहरूनगर येथे होत असलेल्या न्यायालयाजवळ पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी केली.
याबाबत असोसिएशनने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार लवकरच न्यायालयाजवळ जागा निश्चित करून पोलीस चौकी सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्या प्रसंगी अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे, सचिव अॅड. निखिल बोडके, हिशेब तपासणीस अॅड. गोरख मकासरे, सदस्य अॅड. मंगेश खराबे, अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. योगेश गराडे यांच्यासह मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सरकारी वकील साधना बोरकर आदी उपस्थित होते.