न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेची मान्यता न घेता ८ अनधिकृत शाळा सुरू आहेत. या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. यापैकी काही शाळा या गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. शहरातील अनधिकृत शाळांना महापालिका वारंवार नोटीस बजावते. मात्र महापालिकेच्या नोटीसला कुठल्याही प्रकारची दाद शाळांकडून देण्यात आली नाही.
नोटीस बजावण्यात आलेल्या शाळांची यादी दरवर्षी राज्य सरकारकडे पाठविण्यात येते. विशेष म्हणजे या सर्व शाळांना महापालिकेने वारंवार नोटीसही पाठवली आहे. मात्र, शाळा प्रशासानाने महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. शहरातील अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. आता या अनधिकृत शाळांवर राज्य सरकार नेमकी काय कारवाई करते हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.
शहरात नवीन शाळा सुरू करण्याआधी नियमानुसार पालिकेच्या शिक्षणविभागाची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, ८ शाळांनी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले.
ज्ञानराज प्राथमिक शाळा कासारवाडी, मॉर्डन पब्लिक स्कूल रहाटणी, मास्टर केअर इंग्लिश स्कूल भोसरी, ग्रँट मीरा इंग्लिश मीडियम स्कूल चिखली, एम.एस . स्कूल फॉर किड्स सांगवी, साई स्कूल ऑफ एक्सलेन्स पिंपळे सौदागर, चिखली सेंट रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल, माने इंग्लिश स्कूल, राजवाडेनगर, रहाटणी काळेवाडी.
शाळा सुरू करण्यापूर्वी राज्य शासन व शिक्षण विभागाकडून विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. प्रस्ताव सादर केल्यामुळे तत्काळ शाळा सुरू करता येत नाही; परंतु काही शाळांनी मान्यता मिळण्यापूर्वीच शाळा सुरू केल्या असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या आदेशावरून या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, महापालिक…