- बुधवारी सकाळी विठ्ठल मंदिरातून पालखीचे होणार पुण्याकडे प्रस्थान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूतील इनामदारवाड्यातून आज मंगळवारी (दि. २१) रोजी प्रस्थान झाले. देहूरोड येथून पालखी पिंपरी-चिंचवड अर्थात उद्योगनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता ”ज्ञानोबा-माऊली-तुकाराम-तुकाराम” च्या गजरात पालखीचे निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात आणि सातच्या दरम्यान आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्मिनी मंदीरात आगमन झाले.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल-रुक्मिनी मंदीरात होणार आहे. यावेळी निगडी-आकुर्डीसह शहरातील नागरिकांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
आज सकाळी अनगड बाबा येथे पालखीची आरती झाली होती. त्यानंतर पालखीने निगडीकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होते. बुधवारी विठ्ठल मंदिरातून पालखीचे पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. पिंपरी-चिंचवड उद्योग नगरी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयघोषाने दुदुमून गेली होती.