- वरिष्ठ उपाध्यक्षपदी संतलाल यादव, उपाध्यक्षपदी संजय बोरा व महेश मंगवडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- पिंपरी -चिंचवड शहरातील जेष्ठ व सर्व सक्रिय पत्रकारांची आज चिंचवड येथे बैठक पार पडली. या बैठकीत पिपरी- चिंचवड शहर पत्रकार संघ या नवीन पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे आहेत.
संघाची नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे…
अध्यक्ष – दादाराव आढाव, वरिष्ठ उपाध्यक्ष – संतलाल यादव, उपाध्यक्ष – महेश मंगवडे, संजय बोरा, सरचिटणीस – सुनील कांबळे, चिटणीस – श्रद्ध कोतावडेकर-कामथे, खजिनदार – जितेंद्र गवळी, कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी, संतोष जराड, विश्वास शिंदे, सदानंद रानडे.