न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२२) :- संत तुकारामनगर येथे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये एमबीबीएस महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. महाविद्यालयामध्ये १५० जागा असणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. १९) महापालिका सभेमध्ये मान्यता दिली. त्यामुळे आता एमबीबीएससाठी पिंपरीतच विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये शहरासह राज्याच्या काना-कोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विविध अभिनामाची ११८ शासनमान्य अध्यापकांची पदे मंजूर आहेत.
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आणखी ४६ पदे भरण्यात येणार आहेत. धोरणात्मक निर्णय असल्याने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेने महापालिका सभेकडे पाठविण्यात आला होता. त्यालाही प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.














