न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२२) :- रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत, बँक सुरू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे, अशी विविध आर्थिक कारणे आरबीआयने परवाना रद्द करताना दिलेली आहेत.
दरम्यान, ही बँक अन्य बँकेत विलीन करण्यासाठी आतापर्यंत बरेचसे प्रयत्न करण्यात आले. मात्र, बँकेच्या प्रशासकांना यश मिळाले नाही. बँकेची स्थिती २१ सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘जैसे थे’ राहणार आहे. या काळात ठेवीदार आणि सेवकांना विश्वासात घेऊन आणि वैधानिक सल्ला घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असे बँकेच्या प्रशासकांकडून सांगण्यात आले.
रुपी को. ऑप. बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्याची सूचना बँकेस प्राप्त झाली आहे. मात्र, २१ सप्टेंबर २०२२ पर्यंत जैसे थे स्थिती राहणार आहे. दरम्यानच्या काळात ठेवीदार आणि सेवकांना विश्वासात घेऊन आणि वैधानिक सल्ला घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल.
– सनदी लेखापाल सुधीर पंडित, प्रशासक, रुपी बँक…












