- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमधे देशाचा ७5 वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते डौलाने तिरंगा फडकल्यावर सर्व विदयार्थी, पाहुणे आणि पालकवर्गाने खड्या स्वरात राष्ट्रगीत आणि झेंडागीत सादर केले. आपल्या जवानांच्या शौर्याचे गुणवर्णन करणारे बहारदार नृत्य सादर करीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे, उपाध्यक्षा अनिताताई काटे, डायरेक्टर लीनाताई काटे, निहाराताई काटे, युवा नेते निलेश काटे, प्रमुख पाहुणे शांतनू प्रभुणे, काकुळते, पालक वर्गातर्फे अर्चना मोहिते, सरिता श्रीपती, स्वप्नील मालवीय, वैशाली जाधव, स्नेहा सिन्हा, भालेराव आणि पालकवर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
शाळेच्या उपाध्यक्षा अनिताताई काटे म्हणाल्या, मोठ्या कष्टाने आणि थोर क्रांतिकारक यांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या या महान कार्याला स्मरण करीत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. देश एकसंध रहावा यासाठी सर्वांनी एकात्मता, समता, बंधुता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत देशाचे आणि शाळेचे नाव मोठे करावे. आपल्या देशाची शान वाढवावी.
दरम्यान लीनाताई काटे आणि निहाराताई काटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या प्राचार्या सुषमा उपाध्ये, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख पलक गांधी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.