न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२२) :- स्वातंत्र्यदिनानिमित्त काळेवाडी येथील शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
शिवसेना उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, कोळी महासंघाचे अध्यक्ष डी. एम. कोळी, माजी सैनिक पतंगराव सुतार, दिनकर जाधव, लक्ष्मण मंजाळ व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देशभक्तिमय वातावरणात व शिस्तीत काळेवाडी परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, जय हरी ग्रुपचे सदस्य, काळेवाडी परिसरातील तरुण वर्ग, महिला भगिनींनी सहभाग नोंदवला. भारत माता की जय, वंदे मातरम च्या जयघोषात निघालेल्या या रॅलीचे ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.