- सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन विभागातील पुरस्कार कु. प्रतिक्षा डफळ यांना प्रदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये वार्षिक आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. वर्षभरात विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर आणि सौ. शितलताई वर्णेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करीत सन्मान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन विभागातील पुरस्कार कु. प्रतिक्षा डफळ यांना तर, विद्यापीठ व संस्थेतील प्रशासकीय विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सचिन बरबडे, एकता सिंग, अनुभव वाजपेयी, दिपक जैस्वाल, विकास औटी, पीटर गोम यांना विशेष कामगिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांनी बैठकीत मागील आणि चालू वर्षाचा आढाव घेतला. संस्थेचे ध्येय-धोरणे यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बैठकीत विभागप्रमुख अमोल भागवत, विभागप्रमुख प्रो. अनिकेत वंजारी, शिक्षक डॅनियल सर, वेदांत कुलकर्णी, मिलिंद उशिर, प्रेरणा कणावजे, सर्व शिक्षक, उपशिक्षक आणि कमर्चारी वर्ग यांची उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर म्हणाले, आयआयबीएम संस्थेचे नाव सर्वदूर पसरले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी मोठं स्वप्न घेऊन संस्थेत शिक्षणासाठी प्रवेश घेतात. कोणत्याही विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावयास हवे. अभ्यासक्रम पूर्ण करून संस्थेतून जाताना विद्यार्थ्याच्या आठवणीत नेहमीच आपली संस्था रहावयास हवी. त्याकरिता अध्ययनाची पद्धत सर्वोत्कृष्ट आणि शिस्तप्रिय हवी. पुरस्काप्राप्त सर्व शिक्षक व उपशिक्षक यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा आहेत.
कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख अमोल भागवत यांनी तर, आभारप्रदर्शन अनिकेत वंजारी यांनी केले.