- चिंचवडमध्ये पार्किंगमधून दुचाकीवर चोरट्यांचा डल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ९ नोहेंबर २०२६) :- चिंचवड येथील शहीद अशोक कामठे बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक नाना महाले (वय २६, रा. कासारसाई) यांनी आपली दुचाकी (एमएच १४ एचएक्स ७६०४) शहीद अशोक कामठे बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ ते रात्री ११.४५ या कालावधीत अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली.
चोरीला गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. याप्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जमदाडे करीत आहे.

















