न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- मारहाणीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या नाकावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी करत परिसरात दहशत माजवली.
हा प्रकार दिघीत सोमवारी (दि. ५) रात्री पावणेदहा वाजता घडला. राहूल हरिभाऊ अंधारे (वय १९ रा. दिघी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. योगेश सुरेश जोगे (वय १९), अमित अंकुश इंगवले (वय २२), सोहेल अलिशीयर मिर्झा (वय १९), ताकीर हुसेन, आषिश चिंतापरम (वय १८) सर्वजण राहणार दिघी यांना दिघी पोलिसांनी अटक केली असून दोन जण अद्याप फरार आहेत.















