- दारूच्या बॉक्ससह लाखांचा ऐवज लुटला; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- मेदनकरवाडीमधील गवते वस्ती येथे देशी दारूच्या गोडाऊनवर शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गेटचा कडीकोंडा तोडून शटर उचकटून आत प्रवेश केला.
गोडाऊनमधून २२४ देशी दारूचे बॉक्स आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, तसेच एक कॅमेरा असे एकूण सहा लाख तेहतीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार शनिवारी (दि. ३) दुपारी चार ते रविवारी (दि. ४) सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान घडला. अशोक रामचंद वलेषा (वय ५९, रा. पिंपरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.















