न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी येथील मुळा नदीवरील हॅरीस ब्रिजवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवडकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने हॅरिस ब्रिज लगतच्या नवीन पुलावरून न येता नवीन पुलाचे सुरुवातीस उजव्या बाजूकडे वळून जुन्या हरीश ब्रिजच्या डाव्या लेण पुढे येऊन बोपोडी चौकातून पुढे खडकी बाजार मार्गे पुण्याच्या दिशेने जातील.
भाऊ पाटील रोडकडून येणारी वाहने व पुण्याच्या दिशेने जाऊ इच्छिणारी वाहने हॅरीस ब्रिजच्या अंडरपासने पुढे न येता वि.भा. पाटील पुलावरून पुढे शिवाजी पुतळा चौक दापोडी येथून डावीकडे वळून पुढे फुगेवाडी पुलावरून उजवीकडे वळून बोपोडी चौक-खडकी बाजार मार्गे पुण्याच्या दिशेने जातील किंवा आंबेडकर चौकातून पुढे साई चौक-चर्च अंडरपास-चर्च चौक पुढे पुण्याच्या दिशेने जातील.















