- भेळ चौकात शाळकरी मुलींचा तरुणाकडून विनयभंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- प्राधिकरणातील भेळ चौकात एका शाळेत शिकणारी फिर्यादीची १५ वर्षाची मुलगी आणि तिची मैत्रीण यांचा आरोपीने वारंवार पाठलाग केला.
शाळा सुटल्यानंतर भेळ चौकातून घरी जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला ‘गाडीवर बस नाही तर तुझ्या अंगावर गाडी घालीन’ अशी धमकी देत त्यांना आवाज देऊन गाडीवर बसण्याचा इशारा करुन विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
ही घटना ऑगस्ट ते मंगळवार (दि. ६) दरम्यान घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल विनायक गवारे (वय- २७ रा. शुभम डेअरीमागे, निगडी प्राधिकारण) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















