न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या जागेवर बकोरिया यांची बदली करण्यात आली असून राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. बकोरिया येत्या काही दिवसांत पदभार स्वीकारतील, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय सहाय्य म्हणून लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नेमणूक दिल्ली येथे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त होते. त्यामुळे ओमप्रकाश बकोरिया यांची या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.















