न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- अज्ञात कंटेनर चालकाने भरधाव वेगात ट्रक चालवून होंडा शाईन मोटरसायकल (एमएच २६ डीआय ९७२७) ला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक व मागे बसलेले इसम गाडीवरून खाली पडले. डाव्या पायास किरकोळ मुक्कामार लागून मोटरसायकलचे नुकसान झाले तर. दुचाकीच्या मागे बसलेल्या इसमाच्या डोक्यावरून कंटेनरचे पुढील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना (दि. २) रोजी ५:१५ वा चे सुमारास चाकण येथील आस्था हॉस्पिटल समोरील डिव्हायडरच्या ठिकाणी, पांचाली हॉटेल जवळ, तळेगाव-चाकण रोडवर घडली.
फिर्यादी राजकुमार भगवान पवार (वय ३२ वर्ष, रा. वाघजाई नगर, पवन स्वीट होम बिल्डिंगचे समो,र ज्ञानेश्वर साठे बिल्डिंग, चौथा मजला, खराबवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.