न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांची भेट घेतली व दिव्यांग आंदोलकांवर केलेल्या घटनेबाबत त्यांना निवेदन दिले.
युवक काँग्रेसच्या या शिष्टमंडळात पिपंरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, अनिल सोनकांबळे व शहाबाज सिकिलगार आदी उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिव्यांग व दुर्बलांना समाजाकडून सौम्य आधाराची गरज असते. एक सुसंस्कृत समाजाच्या नात्याने हे मानवतेचे कर्तव्य बजावले पाहीजे. मात्र, या प्रकारात घेतलेली कठोर व आक्रमक भूमिका पाहता, पोलिस दलाच्या कार्यपध्दतीबाबत नागरिकांच्या मनांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित दोषींना निलंबित करावे, असे या निवेदनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बनसोडे या निवेदनात नमूद केले आहे.











