न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- प्रत्येक वास्तू विशारद हा मुळचा कलाकार असतो. त्याच्या कलात्मक दृष्टीकोनातून साकारलेली कलाकृती उत्कृष्ठ वास्तू असते. स्वातंत्र्यपुर्व काळात मुंबईत उभारलेल्या वास्तू ‘जागतीक वारसा’ म्हणून आजही दिमाखदारपणे उभ्या आहेत. नविन वास्तूविशारदांनी एकविसाव्या शतकात जागेची उपलब्धता, त्याची उपयोगिता, सौंदर्य आणि आर्थिक गणित या बाबींचा विचार करुन प्रकल्प उभारणी करावी, असे मार्गदर्शन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष विजय गर्ग यांनी केले.
आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये रविवारी (दि. २४) रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयआयएचे माजी चेअरमन निलेश चव्हाण, सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, आर्किटेक्चर प्रशांत देशमुख, पुष्कर कानविंदे, प्रा. सुप्रिया सावंत, प्रा. कविता पाटील, प्रा. नेत्रा नाईक आदी उपस्थित होते. यावेळी एमएमसीए कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुप्रिया नेने, सिंहगड आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. बनाली बॅनर्जी, हनुमंतराव पवार कॉलजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कोळी, इंदिरा कॉलेजचे प्राचार्य स्वप्निल सेठ, अरुण अत्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
निलेश चव्हाण म्हणाले की, समाजामध्ये डॉक्टर, वकील आणि आर्किटेक्ट यांचा सहभाग महत्वाचा आहे. आर्किटेक्ट हा कुटूंबाचे घर बांधून देतो. त्यामुळे आर्किटेक्ट कुटूंब जोडण्याचे एकसंध ठेवण्याचे कार्य करतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच एकंदर समाजाचा विचार केला, तर आर्किटेक्चरचा नंबर वरचा लागतो. विद्यार्थ्यांनी नाविन्याचा ध्यास घेऊन प्रकल्पावर अभ्यास करुन ते सादर करावेत, असे चव्हाण म्हणाले.
प्रास्ताविकात प्राचार्य सोनवणे यांनी अल्पावधीत एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. कॉलेजचे प्राध्यापक, पीसीईटी ट्रस्ट विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच नाविन्यपुर्ण योजनांना संशोधन प्रकल्पांना सहाय्य करण्यासाठी प्रयत्नशील असते, असे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त भाईजान काझी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, सुत्रसंचालन नेत्रा नाईक यांनी मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.











