न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ४ मार्च) :- ‘मनसे आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहर मनसेच्या वतीने दि. २५ फेब्रु. ते २ मार्च या दरम्यान चिंचवड विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व महत्वाच्या ८०० व्यक्तींच्या भेटी-गाठी घेण्यात आल्या.
चिंचवड विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मनसे या पक्षाविषयी माहिती दिली व घरातील सर्व माता-बहीणींची विचारपुस केली. तसेच प्रत्येक मंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांचीही भेट घेण्यात आली. शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विविध सामाजिक संघटनांची भेट घेऊन, त्यांना मनसेच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच त्यांच्यासमोर आगामी निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या ध्येय-धोरणांचा उलगडा देखील कऱण्यात आला. आगामी ‘मनसे आपल्या दारी’ या उपक्रमाचा भोसरी विधानसभा मतदार संघाकडे मोर्चा वळविण्यात आला आहे, असे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.
यावेळी पिंपरी चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हेमंत डांगे, उपशहर अध्यक्ष बाळा दानवले, राजु साळवे, विभाग अध्यक्ष राहुल जाधव, विशाल मानकरी, संजय यादव, मयुर चिंचवडे, सचिव रुपेश पटेकर, महिला सेना अध्यक्ष अश्विनी बांगर, महिला सचिव, सिमाताई बेलापुरकर, स्नेहलताई बांगर, गायकवाड ताई, प्राजक्ता गुजर, अनिता पांचाळ, अनिकेत प्रभु सुरेश सकट, प्रमेश्वर चिंलरगे, अक्षय नाले, सचिन मिरपगार, सचिन भोडवे, प्रतिक शिंदे, रोहित काळभोर, निखील गावडे, विकास कदम, निलेश नेटके व मोठ्या प्रमाणात मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.











