न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मार्च) :- स्थायी समिती सभापतीबाबत रस्सीखेच थांबण्यास तयारच नाही. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शीतल शिंदे यांना डावलून पक्षाने भाजपची स्थायी समिती सभापतीची माळ विलास मडिगेरी यांच्या गळयात घातली आहे.
याबाबत शिंदे यांनी आक्रमक पवित्र घेत बंडखोरी करीत सभापतीपदाचा अर्ज दाखल केला आहे. तसेच विरोधी पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यात आणखी पेच वाढला असून, महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले आहेत की, ”भोसरीतील उमेदवार असला तरी त्यांच्यावर वेगळा ‘शिक्का’ आहे. भोसरीतील स्थायीच्या सदस्यांनी आमचा उमेदवार शीतल शिंदे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भोसरीकरांनी वेगळी भूमिका घेतल्यास बाजी पलटू शकते”.
एकूण पक्षीय बलाबल आहे असे :-
राष्ट्रवादी : मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर = ४
शिवसेना : राहुल कलाटे = १,
भाजपचे भोसरीतील सदस्य : नम्रता लोंढे, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे = ३
शीतल शिंदे : = १
उर्वरित भाजपकडील सदस्य : सागर आंगोळकर, ममता गायकवाड, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, आरती चोंधे, अपक्ष झामाबाई बारणे आणि स्वतः उमेदवार विलास मडिगेरी = ७
त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, भोसरीतील सदस्य आणि शीतल शिंदे स्वतः, असे मिळून नऊ सदस्य होतात. तर भाजपकडे सातच सदस्य राहतात. त्यामुळे बंडखोरी न शमल्यास वेगळाच निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











