न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२२) :- पानटपरीवर फिर्यादी असताना अॅक्टिव्हा मोटार सायकलवरुन आरोपी आले. आरोपींनी विमल गुटखा घेतला. फिर्यादीने आरोपींना गुटख्याचे पैसे मागितले असता ” तु आम्हाला नेहमी पैसे मागतो; तुला खुप माज आला आहे? तुला आज जिवंत ठेवत नाही, असे म्हणुन दोघांनी पॅन्टमध्ये लपवुन ठेवलेला धारदार कोयता काढुन फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या हातावर सपासप वार करुन फिर्यादीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत शिवीगाळ करुन दोघे हातातील कोयते घेवुन त्यांच्या गाडीवरुन पळून गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २७) रोजी रात्री २१.३० वा. नर्मदा गार्डन शेजारी, फेमस अॅग्रो नर्सरीजवळ, पिंपळे गुरव येथील फिर्यादीच्या पानटपरीवर घडली.
फिर्यादी राहुल रामलखन यादव (वय १९ वर्षे, रा. योगेश काटे यांच्या जागेमध्ये, रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी, पिंपळे गुरव, मुळ उत्तरप्रदेश) यांनी आरोपी यश ऊर्फ सनी किशोर वाघमारे (वय २२ वर्षे, रा. श्रध्दा बिल्डींग, जयमालनगर, लेन नं २, जुनी सांगवी), विशाल अशोक फडके (वय १९ वर्षे, रा. शिवतीर्थ बिल्डींग, समर्थनगर, गल्ली नं २, नवी सांगवी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.


















