न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- निगडी येथील चिंचवड मल्याळी समाजम (सीएमएस) च्या वतीने आयोजित केलेल्या स्वाती तिरुनाल नाट्योत्सवम भरतनाट्यम/ मोहिनीअट्ट्म स्पर्धेत खुल्या गटात शिवप्रिया नांबियार, मोठ्या गटात सायली देवधर, गौतम मराठे तर लहान गटात विस्मया नायर यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
यावेळी नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर, सीएमएसचे अध्यक्ष पी. व्ही भास्करन, सरचिटणीस टी. पी विजयन, उपाध्यक्ष के रघुनाथन, खजिनदार के. व्ही जनार्दनन, पी श्रीनिवासन, पी अजयकुमार, समन्वयक विनीत विजयन आदी उपस्थित होते.
मोहिनीअट्ट्म स्पर्धेच्या खुल्या गटात शिवप्रिया नांबियार, विस्मया नायर, शृती नायर तर १७ वर्षापुढील मुलांच्या मोठ्या गटात गौतम मराठे, सोहन यादव, आनंदु अनिलकुमार यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षिसे मिळविले. भरतनाट्यम नृत्य स्पर्धेत १७ वर्षे पुढील मुली मध्ये सायली देवधर, अंजना नायर, मृगा केळकर तर लहान गटात विस्मया नायर, प्रियांका पिल्ले, ऐश्वर्या नायर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले. विजेत्यांना १० हजार, ७ हजार, ५ हजार असे रोख बक्षिसे देण्यात आले.
यावेळी नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ स्वाती दैठणकर, गीता शर्मा, तेजश्री अडिगे, मंजुळा नांबियार, प्रमद्वारा कित्तुर, सुमित्रा दाते, मेघना साबडे, सुवर्णा बग, गीता नायर, प्रज्ञा अगस्ती, अनंत मेनन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी डॉ मालती आग्नेश्वरन( मुंबई), भास्कर मेनन (गुजरात), एन.व्ही बाळकृष्णन (केरळ) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधू अनिलकुमार, अमृता गणेश यांनी केले तर आभार विनीत विजयन यांनी मानले.











