न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यानंद भवन हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवात सुंदर कथ्थक नृत्यांतुन गणेशवंदनेने झाली.
अनेक मुली थोर महिला, कर्तबगार स्त्रियांच्या वेशभूषा करून आल्या होत्या. त्यांची महती मुली स्वतः कथन करत होत्या.नववीच्या मुलींनी स्त्रीयांचे भावविश्व विविध नृत्य प्रकारातून उलगडले.सफाई महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आल्याने सफाई कर्मचारी खूप आनंदी होत्या.
या वेळी निगडी पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे, हवालदार हेमलता भोंडवे, स्नेहसखी परिवाराच्या श्यामल खळदकर, जागृती महिला मंडळ अध्यक्षा ज्योती कानेटकर या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुख्याध्यापिका छाया हब्बू,जया श्रीनिवासन यांच्या हस्ते करण्यात आला.
महिला पी एस आय वाघमारे म्हणाल्या”हल्लीच्या काळात मुलीना असुरक्षितता वाटल्यास गडबडून न जाता संकटाला ध्येर्याने सामना करावा,१०० नंबरचा वापर करावा,” या आणि अश्या बऱ्याच गोष्टीचे मार्गदर्शन मुला मुलींना त्यांनी केले. स्त्रीच्या वेदनांचा तिला जगण्याची उर्मी देतात, असे मत कानेटकर यांनी व्यक्त केले. साहेबराव जाधव यांनी स्त्री विषयक कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
दिपाली वानखेडे यांनी नियोजन, प्राजक्ता राणे हिने निवेदन तर प्रीती राणे यांनी आभार व्यक्त केले











