न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- अज्ञात चोरटयाने २,७२,४८६ रुपये किंमतीच्या लोखंडी पाईपची चोरी केली. २०० एम. एम डायमीटरचे व ५.५ मिटरची लांबी असलेले १८ लोखंडी पाईप, ३०० एम.एम डायमीटरचे व ५.५ मिटरची लांबी असलेले ५ लोखंडी पाईप चोरुन नेले आहेत.
ही घटना (दि. १६/१२/२०२२ रोजी सायं ६.०० वा ते १७/१२/२०२२ रोजी दुपारी ३.०० वा.चे दरम्यान शुध्दीकरण केंद्रासमोर, धर्मराजनगर, पाटीलनगर, चिखली येथे घडली.
फिर्यादी गोवर्धन रामराव पवार (वय २७ वर्षे, रा. सी/ओ. ज्ञानेश्वर बडगुजर यांच्याकडे भाडयाने, संघर्ष कॉलनी, यशस्वी इंग्लीश स्कुलजवळ, मोशी) यांनी आरोपी अज्ञात चोरटा याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.