- महिंद्रा कंपनीजवळील घटना; तरुणाचा लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- निघोजेतील महिंद्रा कंपनीच्या गेट आठसमोर गुरुवारी (दि १९) रोजी सकाळी ८:१५ च्या सुमारास काळया पिवळ्या रिक्षातून फिर्यादी हे प्रवास करीत होते. त्यातील आरोपी तीन अनोळखी प्रवासी आणि अनोळखी चालक यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवला.
फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून, लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी जवळील २०,००० रूपये किंमतीचा लिनोआ कंपनीचा लॅपटॉप व १५,००० रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने चोरुन आरोपी पळून गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी अमन माधव भिसे (वय २१ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. अभिनव हॉस्पीटलजवळ, खराबवाडी, मुळगाव अंचळ, ता रिसोड, जि. वाशीम) यांनी आरोपी अनोळखी (वय २० ते २५ वर्षे) चार जणांच्या विरोधात चाकण (म्हाळुंगे चौकी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.