न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- पिपरी चिंचवड महानगरपलिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इंडो-जर्मन टूलरूम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रशिक्ष्णार्थी यांना ‘उद्योजकता विकास’ याबाबत जागृती करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा (दि. २०) रोजी संपन्न झाली.
व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आत्मसात केलेल्या कौशल्याच्या जोरावर प्रशिक्षणार्थ्यानी नोकरीचा मार्ग न स्विकारता उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा, सकारात्मक उद्योजकीय मानसिकता, राज्य व केंद्र शासनाच्या व्यवसाय निर्मितीच्या सहाय्यक विविध योजनांची माहिती आंतरराष्ट्रीय ट्रेनर विकास भावसार यांनी दिली.
भानुप्रताप देशमुख यांनी इंडो-जर्मन टूलरूम मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कोर्सबाबतची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी शहरामध्ये कुशल मनुष्यबळ घडविण्याबरोबरच उद्योजक घडवण्यासाठी संस्था व महानगरपलिका प्रयत्नशिल असल्याचे नमूद केले. तसेच महानगरपालिकेची औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे केवळ प्रशिक्षण केंद्र न राहता उद्योजकता विकास व समन्वय केंद्र बनविण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गटनिदेशक सोनवणे व काराबळे तसेच निदेशक लांडगे, रेंगडे, अवधूत, कोकणे व कोंडे या निदेशकांनी सहकार्य केले.