- शरद पवार यांच्या हस्ते पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- देशाच्या इतिहासात नव्हती एवढी बेकारी आज वाढली आहे. माणून माणसात राहिला नाही. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण झाला आहे. नोटाबंदीमुळे व्यावसायिकांचा धंदा उठला आहे. यावेळी निवडणुकीत गाफील राहू नका. रात्री एक आणि दिवसा एक असे मॅच फिक्सिंग करू नका, एक दिलाने काम करा आणि अमोल कोल्हे व पार्थ पवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या.
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व मुलगा पार्थ पवार यांच्यासाठी चिंचवडमधील वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन लॉन्स येथे जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी पक्षनेते शरद पवार, मावळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी युवती संघटना, आरपीआय कवाडे गट व मित्रपक्षाचे उमेदवार अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, शेकापचे जयंत पाटील, विलास लांडे, संजोग वाघेरे, सचिन साठे, हनुमंत गावडे, नाना काटे, मयूर कलाटे, विशाल वाकडकर, कणाल थोपटे यांच्यासह शहरातील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पोटाची खळगी भरण्याची कामगार लोकं या शहरात आली. हिंजवडीत नोकरीच्या निमित्ताने तरुण शहरात आले. कामगारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडचा विकास करत असताना पक्षाचे स्थानिक पदाधिका-यांनी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे मोठमोठे रस्ते झाले. विकास कामांचे पवार साहेबांनी भूमीपूजन केलं. दहा वर्ष पालकमंत्री असताना करोडो रुपयांचा पैसा शहरात आणला.
पिंपरी-चिंचवडमध्ये घरांची विक्री होत नाही. रिंगरोड, घरे, शास्ती करांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासने दिली. त्यातील स्वतःची राजकीय पोळी भाजपच्या लोकांनी भाजून घेतली. पार्थ पवार यांची उमेदवारीप जाहीर झाल्यानंतर ही पहिलीच जाहीर सभा होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकत्यांमध्ये मोठा उत्साह होता. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.











