न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- गेल्या पाच वर्षांत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एखाद्या जातीवंत तमासगिराला लाजवेल, असा तमाशा करून दाखविला आहे. त्याला नावच द्यायचे असेल, तर देवेंद्र नागपूरकरासह उद्धव यांचा बहुढंगी, बहुरंगी तमाशा असे नाव देणे योग्य ठरेल.
शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पक्षनेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.
सत्तेत येण्यापूर्वी शास्ती कर माफीचे आश्वासन दिले होते. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचेही आश्वासन दिले आहे. रिंगरोड असेल, कर्जमाफी असेल, शेतक-यांचा परतावा असेल असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होता. त्यातील एकही प्रश्न सत्तेतील भाजप-शिवसेना सरकारने सोडविला नाही.











