न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संत गाडगे बाबा शाखेच्या वतीने कै शिवाजी भोईर सभागृह केशवनगर चिंचवड येथे संघ शाखेचा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला होता.
संघ म्हणजे काय? शाखेत होणाऱ्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती, संघ कार्यक्रमातून समाजभान असणारा कार्यकर्ता कसा घडतो, समाजहिताचे कार्यक्रम कसे राबविले जातात, संघ कार्यकर्ता संस्कारातून घडून समाजात कसा समाज कार्य व देश कार्य करतो आदी कार्य समाजाला कळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राजेंद्र भागवत व दशरथ सर यांनी देश भक्ती प्रार्थना गायन केली. विविध प्रकारची आसने व संघ प्रार्थना सामूहिक गायन झाले. परिसरातील संघ स्वयंसेवक, नागरिक, महिला, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक शिंगाडे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा डॉ. आविक्षित काळे हे कार्यक्रमास वक्ते म्हणून सर्वांना लाभले. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, नगरसेवक सुरेश भोईर यांनी आवर्जून पूर्ण वेळ उपस्थिती दिली.
संघ कार्यवाह पंजाबराव मोंढे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.















