न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेच्या वतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हार फुले अर्पण करण्यापेक्षा वही, पेन व शैक्षणिक साहित्य अर्पण करून वैचारिक अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात येते.
हे अभियान दरवर्षी राबवले जाते. यावर्षी देखील संस्थेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसृष्टी स्मारक येथे (दि. १४) रोजी सकाळी ९.०० वाजलेपासून हे अभियान दिवसभर राबवण्यात येणार आहे.
जयंतीदिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येताना हार फुले न आणता वही, पेन, शैक्षणिक साहित्य अर्पण करून वैचारिक अभिवादन करावे. या अभियाना अंतर्गत जमा झालेले शैक्षणिक साहित्य महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते, असे आवाहन संस्थेने नागरिकांना केले आहे.


















