न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- भोसरीतील क्लासीक कम्युनिकेशन मोबाईल शॉपीमध्ये (दि. १३) रोजी रात्री १०:०० च्या सुमारास अनोळखी महिलेने अॅप्लीकेशनच्या मदतीने बनविलेले २०,००० आणि २५,००० रुपयांचे बनावट ट्रांजेक्शन फिर्यादीला दाखवले.
त्या माध्यमातून हातचालाखीने ४५,००० रूपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन घेऊन जाऊन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
फिर्यादी महेश हिरामण शिंदे (रा. भोसरी) यांनी आरोपी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ३५७/२०२३ भादवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.